'तंबाखू आरोग्यास हानिकारक', 'नवनिर्माण ते नमोनिर्माण'; Raj Thackeray यांच्या निर्णयावर टीकेची झोड
राज ठाकरे निर्णयावर सशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. शिवसेना (UBT) खासदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'नवनिर्माण' 'नमोनिर्माण'पर्यंत पोहोचल्याची टीका केली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'तंबाखू आरोग्यास हानिकारक' या इशाऱ्याची आठवणन करु दिली आहे.
Raj Thackeray's Political Stand: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या जंगी सभेत दमदार भाषण केले. या भाषणात त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आपल्या पक्षाचा पाठींबा नरेंद्र मोदी आणि पर्यायाने महायुती म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयावर सशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. शिवसेना (UBT) खासदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'नवनिर्माण' 'नमोनिर्माण'पर्यंत पोहोचल्याची टीका केली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'तंबाखू आरोग्यास हानिकारक' या इशाऱ्याची आठवणन करु दिली आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रचंड टीका केली आहे. राज्यात पाठिमागील काही वर्षांपासून खोक्याचे राजकारण सुरु आहे. महाराष्ट्र, मुंबई लुटण्याचे, ओरबाडण्याचे उद्योग सुरु आहेत. या सर्व उद्योगाचे खरे सूत्रधार मोदी आणि शाह आहेत. असे असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान अशी ओळख घेऊन निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना कशासाठी पाठिंबा देत आहे. या पाठिंब्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी देणे आवश्यक आहे. अशी नेमकी काय गरज पडली जेणेकरुण तुम्हाला महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देण्याची गरज पडली. जर तुमचा पक्ष नवनिर्माण होता तर त्याला नमोनिर्माण होण्याची गरज का पडली? असा सवाल संजय राऊत यांनी नामोल्लेख टाळत विचारला आहे. दरम्यान, त्यांच्या पक्षाने काय भूमिका, निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, MNS Gudi Padwa 2024 Melava: कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं स्पष्ट)
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर सोशल मीडिया मंच 'X' च्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील!'' (हेही वाचा, Raj Thackeray Announces Support For Mahayuti: नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर- Raj Thackeray यांची मोठी घोषणा!)
राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. राजकीय वर्तुळात चर्चा होती की राज ठाकरे यांचा मनसे भाजपप्रणीत महायुतीमध्ये सहभागी होईल. पण, प्रसारमाध्यमांतून सुरु असलेल्या चर्चा आणि राजकीय वर्तुळातील अटकळ यांचे खंडण करत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजप आणि महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देण्याची घोषणा केली. तसेच, इतर कोणत्याही पक्षाचे प्रमुख, अध्यक्ष होणार नसल्याचे निक्षूण सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2024 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

