आज संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना एकत्रितरित्या येऊन हा कार्यक्रम करता येत नसल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत आहे. या दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक अनोख्या अंदाजात मराठी भाषेचे महत्व जनतेला पटवून दिले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे क्रिडा, मनोरंजन, लेखन क्षेत्रात स्वत:च्या ठसा उमटवलेल्या दिग्गजांच्या मराठीतील स्वाक्ष-या शेअर केल्या आहेत. स्वाक्षरी संग्राहक श्री.सतीश चाफेकर ह्यांच्या संग्रहातून राज ठाकरे यांनी निवडून त्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
"सर्व क्षेत्रात स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या रत्नांनी, मराठी स्वाक्षरीची मोहोर देखील कायम उमटवली. त्यातल्या काही स्वाक्षऱ्या, स्वाक्षरी संग्राहक श्री.सतीश चाफेकर ह्यांच्या संग्रहातून घेऊन ही चित्रफीत केली आहे. तुम्हाला मराठी स्वाक्षरी सुरु करायला ही प्रेरणा" अशा शब्दांत राज ठाकरे यांनी या व्हिडिओखाली अनमोल संदेश दिला आहे.हेदेखील वाचा- Marathi Bhasha Din 2021: मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी न मिळाल्याने मनसे आक्रमक; 'कार्यक्रम होणारच' अमेय खोपकर यांचा इशारा
सर्व क्षेत्रात स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या रत्नांनी, मराठी स्वाक्षरीची मोहोर देखील कायम उमटवली. त्यातल्या काही स्वाक्षऱ्या, स्वाक्षरी संग्राहक श्री.सतीश चाफेकर ह्यांच्या संग्रहातून घेऊन ही चित्रफीत केली आहे. तुम्हाला मराठी स्वाक्षरी सुरु करायला ही प्रेरणा.#मराठीराजभाषादिन pic.twitter.com/Qj7fB3npeK
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2021
या स्वाक्ष-यांच्या व्हिडिओमध्ये कुसुमाग्रजांपासून ते लता मंगेशकर, श्रीराम लागू, सचिन तेंडुलकर, सुलोचना यांच्या देखील मराठीतून केलेल्या स्वाक्ष-या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena) मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) मुंबईत (Mumbai) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुंबई पालिकेने परवानगी न दिल्याने पालिकेने मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी 'कार्यक्रम होणारच, जी कारवाई करायची आहे ती करा,' असा इशाराही दिला आहे