मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यांच्या अयोध्यावारी आधीच महाराष्ट्राचे राजकारण तापत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने (ShivSena) भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत हात मिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करत असल्याची चर्चा आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरून महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे नेते (MNS) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकाला 100 दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. "लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भारताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा, या आशायाचे संदिप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे. यावर महाविकास आघाडीचे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. हे देखील वाचा- Maharashtra Budget 2020: इथे पहा महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 ABP Majha, TV9 Marathi वर लाईव्ह
संदिप देशपांडे यांचे ट्वीट-
लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले .पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले.असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी....शुभेच्छा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 6, 2020
आयआरसीटीसीच्या माध्यमातून 18 डब्ब्यांची विशेष रेल्वेगाडी बुक करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी दुपारी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिन्सहून शिवसैनिकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ही ट्रेन कुर्ल्याहून निघणार होती.
मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यासह विचारातही बदल केला आहे. यापुढे मनसे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी मनसेने आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी यांच्यासोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याची चर्चा होत आहे.