सामना (Saamana) हे शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र आहे.अगदी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असतांना पासुन शिवसेना या मुखपत्राद्वारे स्वत:ची भुमिका मांडण्यासाठी किंवा सहमत नसलेल्या बाबींवर ताशेरे ओढण्यासाठी सामना हे मुखपत्र महाराष्ट्रातील (Maharashtra ) सुप्रसिध्द वृत्तपत्रांपैकी एक आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा सांभाळतात. पण संजय राऊत यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरु असल्याने 'सामना'चे (Saamana) मुख्य संपादक म्हणून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) कार्यरत आहेत. सामनाच्या रोखठोक (Rokhthok) या सदरातून संजय राऊत राज्यातील तसेच देशातील घडामोडींवर आपलं मत मांडतात.
आजही रोखठोक या सदरातून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर (Governor Bhagat Singh Koshyari) ताशेरे ओढण्यात आले आहेत. राज्यपालांनी मुंबईतील (Mumbai) मराठी (Marathi) माणसाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. तरी संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळ्या (Patra Chawl Scam) प्रकरणी ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. तरी आज सामनात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाने रोखठोक सदर प्रकाशित करण्यात आले यावरुन मनसेने (Maharashtra Navnirman Sena) हल्लबोल केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी (Freedom Fighter) नाहीत की त्यांना जेल (Jail) मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. (हे ही वाचा:- Amruta Fadnavis: ..तर देवेंद्र फडणवीसांनी माझा गळा पकडला असं मला वाटतं, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा)
आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 7, 2022
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकांउटवर (Tweeter Account) ट्वीट (tweet) करत आज सामनात प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरावर सवाल उपस्थित केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी या शब्दात संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी संजय राऊतांच्या लेखावर हल्लाबोल केला आहे.