Mumbai Auto| Photo Credits: Twitter/ ANI

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आता शिथील होत आहे. मुंबईमध्ये 5 जून पासून पुनश्च हरिओम म्हणत मिशन बिगीन अगेन (Mission Begin Again) सुरू करण्यात आलं आहे. आता मुंबईमध्ये हळूहळू वर्दळ पुन्हा सुरू होत असल्याने शहरातील काही रिक्षा चालकांनी ( Auto Rickshaws) प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आयसोलेशन कव्हर (Isolation Covers) वापरण्यास सुरूवात केली आहे.यामध्ये रिक्षा चालक आणि प्रवाशामध्ये संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद.

विकी नागपाल या मुंबईतील रिक्षा चालकाने ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाप्रमाणेच त्यांनी अशी आयसोलेशन कव्हर्स कारसाठी बनवण्यास सुरूवात केली होती. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने रिक्षा चालकांसाठी विकीने या भन्नाट आयडियाचा वापर केला आहे. मुंबईमध्ये नजिकच्या काळात अनेक रिक्षांमध्ये अशाप्रकारची कव्हर्स दिसू शकतात.

ANI Tweet 

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे आता टॅक्सी, कॅब, रिक्षा आता चालकासह 2 प्रवासी घेऊन बाहेर पडू शकतो. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी, दुकानदार, खाजगी कंपन्यांचे कर्मचारी यांची वर्दळ सुरू होत असताना मोठ्या प्रमाणात वाहनांची देखील गर्दी रस्त्यावर दिसू शकते. दरम्यान आता मुंबईत MMR रिजनमध्ये ई पास शिवाय नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा आहे.