
Minor Girl Sold By Parents: मुंबईला लागून असलेल्या भिवंडी येथून एक अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. वडिलांनी पैशाच्या आमिषाने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला 35 वर्षांच्या पुरूषा इसमाला 1.20 लाख रुपयांना (Child Marriage)विकले. 'मिड-डे' या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बालविवाहाची ही घटना 6 मे रोजी भिवंडीपासून (Bhiwandi Child Marriage) काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पिलांजे खुर्द नावाच्या दुर्गम आदिवासी गावात घडली.
मुलीला गाडीतून गावाबाहेर नेले जात असल्याचा संशय गावकऱ्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आला होता. त्यांनी गाडी थांबवून तिची झडती घेतली तेव्हा गाडीत एक घाबरलेली अल्पवयीन मुलगी आढळली. तीला साडीत नेसवण्यात आली होती. त्याशिवाय, तिच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या. चौकशीत असे उघड झाले की, मुलीला लग्नाच्या नावाखाली एका 35 वर्षीय पुरूषाला विकण्यात आले होते.
पीडित महिला कातकरी जमातीची
पैशाच्या बदल्यात हे लग्न ठरवण्यात आले होते. पीडित अल्पवयीन मुलगी कातकरी जमातीची आहे. कातकरी जमात ही देशातील सर्वात असुरक्षित आणि वंचित समुदायांपैकी एक मानली जाते.
पोलिसांना माहिती दिल्यानंतर 8 जणांना अटक
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ गणेशपुरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी मंगेश लक्ष्मण गाडेकरसह आठ जणांना अटक केली. लग्नातील मध्यस्थ संजय लक्ष्मण जाधव (40) आणि मुलीचे पालक फरार आहेत.