Mobile Phone (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पब्जी गेम बंद झाला असला तरीही त्यासारखेच अनेक ऑनलाईन गेम्स (Online Game) सध्या आले आहेत. यामुळे ऑनलाईन गेम खेळणे हा प्रकार सध्या तरुणांमध्ये वाढला आहे. मात्र हा गेमिंग प्रकार जीवघेणाही ठरू शकतो. एकत्र ऑनलाइन गेम 'फ्री फायर' खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र कर्जत पोलिसांमुळे 3 दिवसांच्या आता बाळापूर येथील आरोपीस अटक करत पीडित मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, 20 मार्च रोजी पीडित मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे तिचे आई-बाबांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर तिच्या आईवडिलांनी कर्जत पोलिसांकडे तक्रार केली.हेदेखील वाचा-

Nagpur Rape: धक्कादायक! घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 19 वर्षीय तरूणाला अटक

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही मुलं आणि मुली ऑनलाइन ‘फ्री फायर गेम’ खेळत होती. अल्पवयीन मुलगी व हा फसवणूक करणारा मुलगा ऑनलाइन एकत्र गेम खेळत असल्याचे लक्षात आले. या नंतर गोपनीय आणि तांत्रिक माहितीवरून बाळापूर, जिल्हा—अकोला येथे सदर पीडित मुलगी असू शकते अशी माहिती मिळाली. तत्काळ सदर ठिकाणी पोलीस अधिकारी रवाना केले. त्यानंतर आरोपीच्या घरून या मुलीला आणि त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

तपासात आरोपीला माहिती विचारली असता माझे लग्न ठरले आहे, साखरपुडा झाला आहे, अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याच मुलीसोबत तयार केलेला बनावट फोटो पाठवून दिला.