Minor Girl Gangraped In Washim: वाशिम (Washim) मध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी, अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीची तक्रार मिळाल्यानंतर वाशिम पोलिसांनी (Washim Police) प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला होता.
दुसऱ्या दिवशी 22 ऑगस्टला मुलगी सुखरूप सापडली. पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगीची प्रकृती सुधारल्यानंतर सविस्तर तपास सुरू करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत मुलीच्या जबाबावरून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे तीन संशयितांची ओळख पटली. मुलीने सांगितलेल्या तीनही जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या कोठडीत आहेत. (हेही वाचा - Girl Sexually Assaulted In Dombivli: डोंबिवलीत 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; 35 वर्षीय व्यक्तीला अटक)
वाशिममध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार -
#WATCH | Maharashtra | Washim SP Anuj Tare says, "On August 21, an FIR was lodged that a girl aged 13 had been kidnapped. On August 22 we found the girl. Based on her statement and medical examination, it was found that she was aped. All the three names that she had given, all… pic.twitter.com/1P8i9mv2NP
— ANI (@ANI) August 26, 2024
दरम्यान, बदलापूर शहरातील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला ठाणे न्यायालयाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. खासगी शाळेत परिचर असलेल्या आरोपीला त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत कल्याण येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. (हेही वाचा-Badlapur Sexual Abuse: निष्पाप मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा झाले लैंगिक शोषण, एसआयटीने सांगितले शाळा प्रशासनही जबाबदार)
बदलापूर येथील शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेल्या आरोपीला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस तक्रारीनुसार, त्याने शाळेच्या वॉशरूममध्ये बालवाडीतील दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात संतप्त पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी बदलापूर स्थानकावर 10 तास रेल्वे ट्रॅक अडवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.