Traffic | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई - गोवा महामार्गावर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी पहायला मिळत आहे. पेणजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. वाहनांच्या रांगाच रांगा या ठिकाणी पहायला मिळत आहे. या वाहतुक कोंडीचा फटका हा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील बसला आहे.  मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील बसला असून तब्बल अर्ध्या तासांपासून त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकून पडल्याची माहिती आहे. या वाहतुक कोंडी सर्वसामान्य नागरिक देखील त्रस्त झाले असून शनिवार - रविवार असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. यामुळे वाहतुक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.  तसेच मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे देखील वाहतुक मंदावली आहे. यामुळे देखील वाहतुक कोंडी पहायला मिळत आहे.  (हेही वाचा - Mumbai Rain: मुंबईत पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावले, सखल भागात पाणी साचले)

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज बई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. यापूर्वी याच महिन्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोनवेळा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांचा ताफा रायगडकडे निघाला असताना मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोडी झाली. या कोंडीचा फटका चव्हाण यांच्या ताफ्याला देखील बसला. त्यांचे कार जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडली होती.

मुंबई गोवा महामार्ग मार्गाचे काम गेली 12 वर्षे रखडले आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता CBT हे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे.