राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु होतील. तर शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. लॉकडाऊन (Lockdown) झाल्यापासून राज्यातील महाविद्यालये ऑनलाईनच सुरु आहेत. ती ऑफलाईन कधी होतील याबाबत विचारलेलया प्रश्नाच्या उत्तरादाखल उदय सामंत बोलत होते. पुढे बोलताना उदय सामंत यांनी सांगितले, 1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असे उदय सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत यांनी सांगितले की, महाविद्यालय सुरु झाल्यानंतर आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलवू शकत नाही. ज्यांना कॉलेजमध्ये यायची इच्छा असेल त्यांनीच यावे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाणार नाही. अजूनही कोरोनाबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती आहे. मात्र, कॉलेज सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले. (हेही वाचा, Ajit Pawar On Corona Restrictions: कोरोना निर्बंधांबबत अजित पवार यांचे महत्त्वाची माहिती)
राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या कमी होत आहे. विविध गोष्टी सुरु केल्या जात आहेत. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे त्या ठिकाणी कॉलेज सुरु करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यंची परवानगी घेतल्यानंतर महाविद्यालये सुरु होतील, असे सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनीही राज्यातील विविध गोष्टी सुरु करण्याबात आज माहिती दिली. कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी काळात राज्यातील विविध बाबींवर निर्बंध घातले होते. कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमितांची संख्या जसजशी कमी होत आहे, तसतसे निर्बंध शिथील केले जात आहेत. आताबर्यंत बंद असलेल्या बाबी अंदाज घेऊन टप्प्या टप्प्याने सुरु केल्या जात आहेत. कोरोना संक्रमितांची संख्या अशीच कमी होत गेली तर हे सर्वच निर्बंध हळूहळू कमी केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही तसाच मनोदय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते.