Aditya Thackeray Ayodhya Tour: मंत्री आदित्य ठाकरे आता 10 जून ऐवजी 15 जूनला जाणार अयोध्येला, संजय राऊतांची माहिती
Aaditya Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आता 10 जून ऐवजी 15 जूनला अयोध्येला (Ayodhya Tour) जाणार आहेत. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार असल्याने आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. प्रभू रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत जाऊन महाराष्ट्रात रामराज्य आणणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते. हेही वाचा Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी बाबरीवर चढण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यांच्या वजनाने ती खाली पडली असती, मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार असल्याने आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. प्रभू रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जाऊन महाराष्ट्रात रामराज्य आणणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते.