मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दक्षिण मुंबईच्या कुलाबा (Colaba) परिसरातील एका डान्स बार (Dance Bar) वर छापा मारला, त्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे (BMC) एक वरिष्ठ अधिकारी व इतर 15 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या 9 कर्मचाऱ्यांना तसेच 6 ग्राहकांनाही अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. यामध्ये यामध्ये उप नगरपालिका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या लोकांवर भारतीय दंड संहिता (IPC) आणि महाराष्ट्र हॉटेल व प्रतिष्ठान अधिनियमाच्या अंतर्गत विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. लवकरच यासर्वांना कोर्टात हजर केले जाईल.
मुंबईच्या कुलाबासारख्या उच्चभ्रू वस्तीतील प्लॅटिनम बिअर बार, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरु असतो. तसेच इथे अनेक बेकायदेशीर गोष्टी चालतात, अवैध धंदे केले जातात अशी माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत कारवाई करण्यासाठी बुधवारी रात्री पोलिसांनी या बारवर धाड टाकली. त्यावेळी बार बंद करण्याची ठरवून दिलेली वेळ उलटून गेल्यावरही बार चालू होता, तसेच आतमध्ये बारबाला डान्स करत असल्याच्या आढळल्या, ग्राहक त्यांच्यावर पैसे उधळत होते, सोबत अश्लील हावभाव आणि कृत्येही चालू होती. (हेही वाचा: डान्सबार मधील अवैध चाळ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे निलंबन)
या धाडीत पोलिसांनी 15 लोकांना ताब्यात घेतले. आश्चर्य म्हणजे यामध्ये महापालिका उपायुक्ताचाही समावेश आहे. सध्या पोलिसांनी हा बार बंद केला असून, इथल्या महिला कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे.