मायक्रोस्पॉट (Photo Credits: Pixabay)

सातत्याने दुसऱ्या वर्षीही आयआयटीच्या (IIT Mumbai) प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्या उभ्या होत्या. यंदा 275 कंपन्यांचे नोकरीचे 800 प्रस्ताव आयआयटी मुंबईकडे आले होते. त्यासाठी आयआयटीमधील 1 हजार 650 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक पगारची ऑफर देऊ केली आहे. 1 कोटी 14 लाख रुपये वार्षिक पगाराची ऑफर विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. आयआयटीत सध्या प्लेसमेंट सुरु आहेत. या प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना या गलेलठ्ठ पगाराची ऑफर देण्यात आली आहे. गलेलठ्ठ पगार देणाऱ्या टॉप 7 कंपन्या; नोकरी करणाऱ्याची हमखास चांदी

आयआयटीमधील अनेक विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्टसोबत काम करण्याची इच्छा असते, हे अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतील शाखेसाठी उमेदवारांची निवड केली आहे. यंदा मुलाखतीत 156 विद्यार्थ्यांना नोकरीचे प्रस्ताव आले होते. त्यातील 126 विद्यार्थ्यांनी नोकरी स्वीकारली आहे.

विद्यार्थ्यांना अनेक मुलाखती द्याव्या लागू नयेत त्याचबरोबर कंपनीची निवड करणे सोपे जावे यासाठी आयआयटीने प्लेसमेंट सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी इच्छुक कंपन्यांना देण्यात आली होती. त्यावरुन कंपन्यांनी विद्यार्थ्यांपुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे.