Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडाच्या मुंबई (MHADA Mumbai) मधील घरांच्या सोडतीच्या अर्जाला अजून एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. 4082 घरांसाठी म्हाडाने अर्ज काढले आहेत. सोमवार 10 जुलै हा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता परंतू म्हाडाने आता आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करण्याची मुदत 11 जुलै च्या रात्री 11.59 पर्यंत वाढवली आहे. तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी बँकेच्या कार्यालयीन वेळेदरम्यान अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येतील.

22 मे पासून मुंबई तील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्विकृती सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर पहिली मुदतवाढ करून 10 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारले जातील असं सांगण्यात आले पण अनेकांना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही आता पुन्हा 24 तासांची मुदतवाढ करण्यात आली आहे.

अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम जमा करून अर्ज सादर करण्याची मुदत 10 जुलैला संपणार असल्याने अनेकांनी सकाळपासूनच मोठय़ा संख्येने अर्ज भरले. यंदाच्या सोडतीमध्ये घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा केल्याने अनेकांनी नाराजी देखील बोलून दाखवली होती. घरांच्या वर्गावारीनुसार त्याच्या किंमती नसल्याने केवळ लोन वर अवलंबून राहून घर घेणं अनेकांच्या आवाक्याबाहेरचे होते. नक्की वाचा:  Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी काढणार सोडत, गोरेगाव येथे 2, 638 घरांचा प्रकल्प, जाणून घ्या, सविस्तर माहिती .

दरम्यान या सोडतीमध्ये दादर, विक्रोळी, ताडदेव, गोरेगाव, शीव, वडाळा या भागातील घरांचा समावेश होता. 2019 नंतर 4 वर्षांनी मुंबईकरांसाठी ही लॉटरी म्हाडाने जाहीर केली आहे.