MHADA Lottery 2022: म्हाडाच्या घरांसाठी मुंबईत दिवाळी मध्ये तर पुणे विभागातही लवकरच जाहीर होणार सोडत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Facebook)

मुंबई, पुण्यामध्ये घरं घेण्याचा प्लॅन घेणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच म्हाडा कडून येत्या काही महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडत जाहीर होणार आहे. त्यामुळे शहरांत सामान्यांना घरं विकत घेण्याची अजून एक संधी येत्या काही दिवसांत उप्लब्ध होणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल माहिती देत ट्वीट केले आहे. मुंबईत दिवाळीमध्ये 3000 घरांसाठी सोडत निघण्याची शक्यता आहे.

मुंबईत 3000 आणि पुण्यात पिंपरी-चिंचवड भागात देखील चार ते पावणेपाच हजार घरांसाठी सोडत काढण्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागात घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मुंबई मध्ये दिवसभर कष्ट करून राहणारी लोकं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये गर्दी वाढत आहे आणि घराच्या किंमती सामान्यांच्या हाताबाहेर जात आहेत. अशामध्ये आता म्हाडा कडून अंबरनाथ मध्ये मोठी टाऊनशीप बांधली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: MHADA Houses to Police: बीडीडी चाळीतील पोलिसांना 50 लाख रुपयांत घरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा .

मुंबई म्हाडा लॉटरी

पुणे म्हाडा लॉटरी

म्हाडा पुणे मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यात 4744 घरांसाठी सोडत निघणार असून त्यामध्ये 2092 घरं ही 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर 2685 घरं सर्व गटांसाठी असतील. 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुण्यातील येरवडा, कसबा पेठ, महमंदवाडी, केशवनगर- मुंढवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगांव, पाषाण, खराडी या भागासह पिंपरी चिंचवडमधील वाकड, थेरगाव, मुंढवा, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली, पुनावळे, मामुर्डी या भागांमध्ये 2092 घरं उपलब्ध असतील. ही अत्यल्प, अल्प गटांसाठी असणार आहे.