वीज ग्राहकांसाठी खुशखबर! 1 एप्रिलपासून वीज दरात 2 टक्क्यांनी घट करण्याचे MERC चे आदेश
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

राज्यातील वीज ग्राहकांसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर येत आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीजेचे दर सुमारे 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. या निर्णयामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमईआरसीने (MERC) एफएसी फंडच्या (FC Fund) माध्यमातून वीज कंपन्यांनी फंडचा वापर करावा, असे आदेश देण्यात आले आहे. ABP माझाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

1 एप्रिलपासून संपूर्ण वर्षभरासाठी वीज दर कमी करण्याचे आदेश टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना देण्यात आले आहेत. महावितरण रहिवाशी इमारतींसाठी 1 टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना 2-5 टक्के वीजदर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तर बेस्टला रहिवाशी इमारतींसाठी 0.1 टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना 0.3-2.7 टक्के वीज दर कमी करण्याचे आदेश आहेत.

रहिवाशी इमारतींसाठी 0.3 टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना 1.4-1.6 टक्के वीज दर कमी करण्याचे आदेश अदानीला मिळाले आहेत. टाटा रहिवाशी इमारतींसाठी 4.3 टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना 1.1.-5.8 टक्के वीजदर कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यापूर्वी मार्च 2020 मध्ये या एफएसीच्या माध्यमातून वीज दरात दिलासा देण्यास सुरुवात करण्यात आली होती. तर मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी 10 टक्के वीज दर कमी करण्यात आल्याचे एमईआरसीने सांगितले आहे. दरम्यान, देशात वाढत्या इंधनदरामुळे त्रासलेल्या नागरिकांना Maharashtra Electricity Regulatory Commission च्या या निर्णयामुळे नक्कीच दिलासा मिळेल.