महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केल्यापासून मनसेने पाकिस्तानी (Pakistan) आणि बांगलादेशी (Bangladesh) घुसखोरांच्या विरोधात आक्रमक घेतली आहे. तसेच पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देण्यासाठी मनसे मुंबईत महामोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मनसे पुन्हा नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम सुरू केली आहे. याशिवाय मनसेने नागरिकांसाठी अनोख्या पद्धतीची ऑफर आणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोऱ्यांची माहिती देण्याऱ्या नागरिकांना मनसेकडून थेट 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, असे स्टॉल औरंगाबाद येथीस मनसैनिकांनी उभारला आहे. मनसेने घेतलेल्या नव्या भुमिकाचा पक्षासा किती फायदा होईल, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
राज ठाकरे यांनी 23 जानेवारी झालेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोर यांना हकलून द्या म्हणत आपली भ स्पष्ट भूमिका मांडली होती. औरंगाबाद शहरातदेखील घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांच्या घराशेजारी देखील असेच लोक राहत असतील म्हणून औरंगाबाद मनसेने ही योजना आखली आहे. यामुळे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तींना 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती मनसेकडून पोलिसांना दिली जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. तिथे गुप्त पद्धतीने माहिती देण्याचीही सोय असेल. माहिती खरी ठरल्यास संबंधित व्यक्तीला 5 हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा औरंगाबाद येथील मनसैनिकांकडून करण्यात आली आहे. हे देखील वाचा- पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये मराठी विषय अनिवार्य; उल्लंघन केल्यास होणार एक लाखाचा दंड!
पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी शोधलेल्या तिघांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी तिघांची तब्बल सहा तास चौकशी केली. त्यात ते भारतीयच असल्याचे सिद्ध झाले होते. ते उत्तर प्रदेश आणि कोलकता असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर यातील रोशन शेख याने मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी घरात घुसून बाहेर काढले. त्याचबरोबर आपल्याला बांगलादेशी संबोधल्याचे शेख याने तक्रारीत म्हटले आहे.