बंदुकीचा धाक दाखवत विवाहित महिलेवर बलात्कार (Rape) केल्या प्रकरणी औरंगाबाद (Aurangabad) येथील नगरसेवक (Corporator) मतीन सय्यद ( Matin Sayyed)याला चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार मतीन सय्यद हा एमआयएम पक्षाचा नगरसेवक होता. मात्र, बलात्काराचा आरोप होताच एमआयएम (MIM पक्ष नेतृत्वाने त्याची काही दिवसांपूर्वीच पक्षातून हाकालपट्टी केली होती. एका विवाहित महिलेने त्याच्यावर सात दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता.
दरम्यान, टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार नगरसेवक मतीन सय्यद याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चाकण पोलीस स्टेशमध्ये सय्यद मतीन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सय्यद याच्यावर औरंगाबाद येथी शहर पोलीस स्थानकातही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी नगरसेवक मतीन सय्यद हा अत्यंत वादग्रस्त असल्याने सतत चर्चेत राहतो. औरंगाबाद नगरपालिकेत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला मतीन सय्यद याने विरोध केला होता. त्यानंतर सभागृहातील काही इतर नगरसवेकांनी त्याला जोरदार मारहाण केली होती. त्यावेळीही तो जोरदार चर्चेत आला होता. (हेही वाचा, ज्योतिष महिलेवर टेलिव्हिजन अभिनेत्याने बलात्कार केल्याचा आरोप, एफआयआर दाखल)
दरम्यान, चाकण येथील तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सय्यद मतीन याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या काळात लोणावळा येथील वॉटर पार्क, कृष्णानगर रेसिडेंसी, बारामती, टाऊनहॉल, शरणापूर येथील गिरीजा लॉजिंग आणि औरंगाबादच्या हर्सुल येथील इमारतीत घडली. आरोपींनी आपल्याला गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. याशिवया आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या कागदावर आपल्या सह्या घेतल्या. तसेच, बलात्कार करण्यासाठी आरोपीने आपल्याला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोपही पीडितेने मतीन सय्यद याच्यावर केला आहे.