Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वे (Central Railway) च्या प्रवाशांना आज मेगाब्लॉक (Megablock 30th June)  पासून सुट्टी मिळणार आहे, आज म्हणजे रविवारी 30 जुन ला माटुंगा  (Matunga) ते मुलुंड (Mulund) स्थानकांदरम्यान घेण्यात येणारा ब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे. मात्र, हार्बर (Harbour Railway)  मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान घोषित केलेला ब्लॉक नियोजित वेळेनुसार घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. दरम्यान, पश्चिम रेल्वे (Western Railway) वरील वसई रोड यार्डच्या कामांसाठी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असला तरी उपनगरीय लोकलवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे पश्चिम रेल्वेने काल सांगितले होते.

मध्य रेल्वे ट्विट

रविवार 30 जून 2019 मेगाब्लॉक वेळापत्रक

हार्बर रेल्वे

वडाळा रोड ते मानखुर्द या स्थानकांच्या मध्ये अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेऊन रेल्वेचे काम करण्यात येणार आहे. ब्लॉक काळातील वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवासी सुविधेसाठी पनवेल ते मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बर प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 पर्यंत मध्य आणि ट्रान्सहार्बरने प्रवास करण्याची सूट देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

वसई रोड (यार्ड) च्या कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत 6 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. मात्र उपनगरीय लोकल वेळापत्रकानूसार धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.