Megablock Update 18 August: मुंबईकरांचा वेग मंदावणार; आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पहा वेळापत्रक
Image For Representation (Photo Credits-Facebook)

आज, 18 ऑगस्ट रोजी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर तांत्रिक कामानिमित्त मेगाब्लॉक (Megablock)  घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway)  मार्गावर माटुंगा (Matunga)  ते मुलुंड (Mulund)  स्थानकात व हार्बर मार्गावर  (Harbour Railway) कुर्ला (Kurla) ते वाशी (Vashi)  दरम्यान मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. तर पश्चिम रेल्वे (Western Railway) वर चर्चगेट (Churchgate) -मुंबई सेंट्रल (Mumbai Central)  दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे आज तिन्ही रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्या विलंबाने असतील. यामुळे अनेक मुख्य रेल्वे स्थानकात नेहमीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून मगच आपल्या यात्रेचे नियोजन करावे असे रेल्वेने सूचित केली आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे वर माटुंगा ते मुलुंड स्थनांकांच्या दरम्यान सकाळी 9.52 ते दुपारी 2.42 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉक दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत लोकल 15-20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

आज, पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत असणार आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या मार्गावरील काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कुर्ला-वाशी स्थानकातील लोकल सेवा पूर्णतः बंद असणार आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर लोकच्या विशेष फेऱ्या सुरु राहणार आहेत. प्रवासी आपल्या नेहमीच्या पास किंवा तिकिटावर या मार्गाने प्रवास करू शकतात.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून मुंबईत जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर व त्यापाठोपाठ तांत्रिक कारणाने मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आला नव्हता. त्यामुळे रखडलेल्या तांत्रिक व व्यवस्थापनीय कामांसाठी आजचा ब्लॉक आवश्यक असणार आहे.