Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

Mumbai Local Mega Block: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी 15 डिसेंबर रोजी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर उद्या मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock)आहे हे लक्षात ठेवा. लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. नाही तर तुमच्या प्रवासाचा खोळंबा होईल हे नक्की. कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान, रुळांची दुरुस्ती, अभियांत्रिकी आणि देखभाल तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाणाऱ्या रेल्वे विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहोचेल.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक 

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.