मुंबई लोकलच्या मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर विविध तांत्रिक कामानिमित्त उद्या म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी सकाळपासून मेगाब्लॉकचे (Megablock) नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार , मध्य रेल्वे वर माटुंगा (Matunga) ते मुलुंड (Mulund) दरम्यान तर हार्बर मार्गावर वडाळा रोड (Vadala Road) ते वाशी (Vashi) आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूझ (Santacruz) ते गोरेगाव (Goregaon) या स्थानकांच्या मध्ये ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. ब्लॉक दरम्यान नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मेगाब्लॉक वेळापत्रक
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे वर माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून काढल्या जातील. तसेच सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात देखील थांबणार आहेत. या सर्व सुविधा 15 ते 20 मिनिटे उशिराने असतील.
हार्बर रेल्वे
वडाळा रोड ते वाशी या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 पासून ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉकचे नियोजन आहे. परिणामी या ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अशा दोन्ही मार्गावरील उपनगरी लोकलच्या फेऱ्या रद्द असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नेहमीप्रमाणे पनवेल ते वाशी ते पनवेल दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे चालवण्यात येणार आहे.
पहा ट्विट
Mega Block on 13.10.2019
Matunga-Mulund Dn fast line from 10.30 am to 3.00 pm and Vadala Road-Vashi Up & Dn harbour lines from 11.10 am to 3.40 pm. pic.twitter.com/KmSLzLvyfC
— Central Railway (@Central_Railway) October 12, 2019
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन अशा धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. या मुळे सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. राम मंदिर स्थानकात मात्र लोकल थांबणार नाहीत.
मागील दोन आठवड्यांपासून पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉकमुळे प्रवाशांना बराच दिलासा मिळाला होता मात्र उद्या पुन्हा एकदा ब्लॉक आणि परिणामी लोकलचा मंदावलेला वेग याचा सामना करावा लागणार आहे.