मुंबई लोकल Photo Credits PTI

दर रविवार प्रमाणे उद्या म्हणजे 23 जूनला  (23 June Megablock Updates)  देखील मुंबई लोकलच्या मार्गावर तांत्रिक कामाच्या निमित्ताने मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या मध्य (Central Railway) , पश्चिम (Western Railway)  आणि हार्बर (Harbour Railway)  अशा तीन ही मार्गांवर दिवसा ,मेगाब्लॉक असल्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचा प्लॅन आखावेत . उद्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बर वर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील

मध्य रेल्वे

माटुंगा ते मुलुंड  डाऊन जलद मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.30 वाजता सुरु होऊन दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे.  ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या सेमीफास्ट व फास्ट गाड्या मुलुंड पर्यंत डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत, ठाण्याच्या पुढे या गाड्या पुन्हा फास्ट मार्गावरून धावतील. या लोकल गाड्यांची सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु असेल. तसेच ठाण्यावरून सुटणाऱ्या फास्ट व सेमी फास्ट लोकल या नेहमीच्या स्थानकांसोबतच मुलुंड, भांडुप, विक्रोळी येथे देखील थांबतील. धीम्या मार्गावरील गड्यांची वाहतूक अंदाजे 15 मिनिटे उशिराने सुरु असणार आहे.

मध्य / हार्बर रेल्वे ट्विट

हार्बर रेल्वे

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे या दोन्ही मार्गावर रविवारी अप दिशेच्या रुळावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40पर्यंत तर डाऊन दिशेच्या मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या वेळेत वाशी, पनवेल, बांद्रा, गोरेगाव, बेलापूर या स्थानकातून अप मार्गाने सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल निर्धारित वेळेसाठी बंद ठेवण्यात येतील. मात्र याऐवजी कुर्ला स्थानकातून पानवेलकडे जाणाऱ्या विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.35  पासून ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक च्या कालावधीतदोन्ही जलद मार्गावरील गाड्यांची वाहतूक ही धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मुंबई पुणे आणि कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन्सला जोडले जाणार अत्याधुनिक LHB Coaches, प्रवास होणार अधिक सुसाट आणि सुरक्षित

पश्चिम रेल्वे ट्विट

दर आठवड्याला तांत्रिक दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेऊन ही अद्याप रेल्वेच्या दिरंगाईने धावणाऱ्या गाड्यांनी मुंबईकर त्रस्त आहेत. अशात आता उद्याच्या ब्लॉकमुळे येत्या आठवड्यात तरी रेल्वे वेळेत धावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.