वैद्यकिय पदव्युतर (Medical PG Students) प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा समजातील (Maratha Cast) विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता मनसे (MNS) पक्षाने उडी घेतली आहे. यापूर्वी या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे आता राज्य सरकार हे आंदोलन मिटवण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहे. तर लवकरच आता याबद्दल अध्यादेश काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच पदव्युत वैद्यकिय आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज्य सरकारकडून यासाठी प्रतिसाद न मिळ्याने त्यांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांनी विनंती केली. या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाईल असे आश्वासन राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये या मुद्द्यावरुन चर्चा झाली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर आंदोलनासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत चर्चेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे सरकार अध्यादेश काढणार हे शंभर टक्के सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातून या बाबत काही प्रश्न सुटतो का याची सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे.(मराठा आरक्षण नाकारल्याने मेडिकलचे विद्यार्थी पुन्हा एकदा आझाद मैदानात उतरले, अजित पवार यांनी भेट घेतली)
तर उद्या प्रवेशाची शेवटची तारीख आहे.मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ केली जाणार आहे. तसेच फडणवीस यांची सुद्धा निवडणुक आयोगासोबत चर्चा सुरु असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. तर मंत्रालयात अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी सरकारने आचार संहिता शिथिल करावी त्यामुळे सरकारला प्रवेशाबद्दल निर्णय घेता येईल अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.