Shiv Sena Vs BJP: अंगावर आले तर, शिंगावर घेऊ; शिवसेनेचा भाजपला इशारा
Shiv Sena,BJP | (Photo credit: archived, edited, symbolic images)

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून (Shiv Sena) टीका करण्यात आली होती. शिवसेनेने केलेल्या टीकेवरून भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर भाजपचे अनेक कार्यकर्ते थेट शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) आंदोलनासाठी दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले. ज्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यावर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "या घटनेसंदर्भात नेमके काय झाले? याची मला काहीच माहिती नाही. शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर, शिवसेनिक त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर देतील. सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. परंतु, कारण नसताना कोणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे. हे देखील वाचा- Shiv Sena Bhavan: माहिम पोलिसांकडून 7 शिवसेनेचे नेते/कार्यकर्त्यांवर FIR दाखल, शिवसेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर पोलिसांकडून कारवाई

ट्वीट-

भाजप आणि शिवसेना कार्यकर्यांमध्ये शिवसेनाभवनासमोर झालेल्या राड्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली होती. दरम्यान, पोलिसांनी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.