Marine ship washed ashore at Alibaug (PC - ANI)

Raigad: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्याजवळ (Alibaug Shores) अरबी समुद्रात वाहून गेलेल्या टगबोटीतील (Tugboat) सर्व 14 क्रू मेंबर्स (Crew Members) ची सुटका करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. जेएसडब्ल्यू ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या जहाजातून चालक दलातील सदस्यांचे बचाव कार्य तटरक्षक दलाच्या मदतीने सुरू करण्यात आले होते.

रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या बचावकार्यात गुंतले होते. टगबोटीतील सर्व 14 क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने टगबोटीतून क्रू मेंबर्सना बाहेर काढले आणि त्यांना अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर सुखरूप उतरवले. सर्व 14 सदस्य सुरक्षित असल्याचेही घार्गे यांनी सांगितले. (हेही वाचा -No School Holiday in Mumbai Today: मुंबई मध्ये आज शाळा-कॉलेजला सुट्टी नाही; पहा IMD चे आज, उद्याचे हवामान अंदाज!)

पहा व्हिडिओ -

JSW द्वारे संचालित एक लहान मालवाहू जहाज आज वादळी हवामानात जयगड आणि सालाव दरम्यान घसरले. जोरदार वारा आणि कमी दृश्यमानतेमुळे ते वाहून गेले. जेएसडब्ल्यू समूहाने गुरुवारी याबाबत एका निवेदनात माहिती दिली होती.

अलिबाग किनाऱ्यावर वाहून गेली टगबोट -

पोलिस अधिकारी घार्गे यांनी सांगितले की, टगबोटचे इंजिन बंद पडल्याने गुरुवारी अलिबाग किनाऱ्याजवळ कुलाबा किल्ल्याजवळ किना-यावर वाहून गेली. रायगड पोलीस आणि तटरक्षक दलाकडून जहाजात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते. मात्र मुसळधार पाऊस, भरती-ओहोटी आणि जोरदार वाऱ्यामुळे या बजावकार्याला अडथळा येत होता. मात्र, आज जहाजातील क्रू मेंबर्संना सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले आहे.