Marathi Signboards | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिकेने (BMC) दुकानांवरील नामफलक (Marathi Signboards at Shops) म्हणजेच पाट्या मराठीत लावण्यासाठी दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे की, महानगरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी साइनबोर्ड ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या नियमाचे पालन होते आहे की नाही यासाठी तपासणी करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली जात आहे. ज्या दुकानदारांनी अथवा अस्तापणांनी मराठी पाट्या लावण्याबाबतचा नियम पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

बिएमसीने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकारनुसार दुकानाे, कार्यालये आणि अस्थापनांवरील फलक मराठीत झाले आहेत किंवा नाही याबाबत पुढचे 8 ते 10 दिवस एक सर्व्हे केला जाईल. सर्वेद्वारा आढावा घेऊन प्राप्त अहवालानुसार संबंधितांना सूचना देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांवर आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. (हेही वाचा, Marathi Signboards on Stores: मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिका करणार कारवाई)

मुंबई महापालिकेने महानगरातील दुकाने आणि आस्थापनांना मराठीत (देवनागरी लिपीत) नाव लिहिलेले आणि ठळकपणे प्रदर्शित करण्यासाठी फलक लावण्यासाठी ३१ मेची मुदत दिली होती. ही मुदत आता संपली आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगार आणि सेवा शर्तींचे नियमन) अधिनियम, 2017 आणि महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगार आणि सेवा शर्तींचे नियमन) अधिनियम, 2022 नुसार उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.