वैद्यकीय प्रवेश परिक्षेसाठी मराठा आरक्षण लागू न केल्यास मराठा समाजाकडून 10 मे पासून आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा ठोक मोर्चाने सरकारला दिला आहे. तर येत्या 8 मार्च पर्यंत या संदर्भात निर्णय घेण्यात यावा नाहीतर प्रवेश प्रक्रिया थांबवावी अशी मागणी मराठा ठोक मोर्चाचे समर्थक आबासाहेब पाटील यांनी केली आहे. त्याचसोबत 10 मे पर्यंत निर्णय न झाल्यास समाज आक्रमक होईल असे ही त्यांनी म्हटले आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये यासाठी सरकारने याबद्दल निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण प्रवेशात आरक्षणाचा निर्णय संचालकांच्या हातात नसल्याचे क्रांती मोर्चाच्या नेत्यांना देण्यात आली आहे. याबद्दल निर्णय राज्य सरकारच्या हातात असल्याने तेच यावर ठोस भुमिका घेऊ शकता असे वैद्यकीय शिक्षण संचालकांनी म्हटले आहे.(Maharashtra PG Medical Admission 2019 प्रवेशप्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही- हायकोर्ट)
30 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. परंतु नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ वैद्यकीय विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे बोलले जात आहे.