Maratha Reservation: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा 25 जानेवारीला बंद

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा बांधवांसह राज्याची  राजधानी मुंबईकडे निघाले आहेत. 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगे पाटील मुंबई मध्ये येऊन मराठा आंदोलन कायम ठेवण्यावर ठाम)

मराठा बांधवांचा मोर्चा हा मुंबईमध्ये धडकणार आहे. 25 जानेवारीला जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये प्रवेश करतील. त्याचदृष्टीने 25 तारखेला नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली आहे. 25 तारखेला बाजार समितीतील पाचही बाजारपेठा राहणार बंद राहणार आहेत. एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवालीमधून निघालेल्या मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. काल रांजणगावमध्ये असलेला हा मोर्चा आज पुण्यात मुक्कामी असेल.