Maratha Reservation: मराठा समाजास दिलासा, आरोग्य विभागात EWS आरक्षणातून भरती
मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजात आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या काही संघटनांनी राज्यात पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मराठा समाजासाठी काहिसा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागात मोठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी (Health Department Recruitment) एसईबीसी प्रवर्गातील पद खुले करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्मयामुळे EWS प्रवर्गातून मराठा समाजातील पात्र उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करु शकतात.

रज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाने आरोग्य भरती संदर्भात आदेश काढला आहे. या आदेशाला अनुसरुन मार्च 2019 मध्ये एक जाहीरात देण्यात आली होती. या जाहीरातीनुसार राज्यात या विभागात एकूण 13000 रिक्त पदे भली जाणार आहेत. राज्य सरकारने सवलत दिल्याने ही भरती EWS आरक्षणातून केली जाणार आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा समाजास दिलासा, आरोग्य विभागात EWS आरक्षणातून भरती)

भरती होत असलेली पदे (मार्च 2019 अनुसार)

  • आरोग्य पर्यवेक्षक
  • औषधी निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक पुरुष
  • आरोग्य सेवक महिला
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील एका मोठ्या वर्गासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी EWS नुसार भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला 10% आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक आणि पात्र उमेदावार या पदासाठी अर्ज करु शकतात. दरम्यान, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज दाखल केले असतील त्यांनी आपले अर्ज 1 ते 21 जुलै 2021 दरम्यान खुल्या वर्गात ठेवायचे आहेत. शिवाय बर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या EWS प्रवर्गातून अर्ज दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.