निलंबित मुंबई पोलिस गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी (Mansukh Hiren Death Case) विविध पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सूत्रांनी रविवारी दिली आहे. मुनसुख हिरे मृत्यूप्रकरणी तपास करत असेलेल्या एनआयएने सचिन वाझे यांना बीकेसी येथील मीठी नदीच्या पुलावर (Mithi River) नेले होते. सचिन अटकेपूर्वी वाझेने हार्ड डिस्क, मोबाइल फोन आणि या प्रकरणाशी संबंधित इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा एनआयएने केला आहे.
मिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIAकडून शोधमोहीम राबवण्यात आली. जवळपास 4 तास ही शोधमोहीम चालली. यात कम्प्युटरचे दोन सीपीयू, गाड्यांचे दोन नंबर प्लेट, एक लॅपटॉप आणि इतर काही सामान नदीतून काढण्यात आले आहे. दोन्ही नंबर प्लेट्सवर एकच नंबर आहे. या सर्व वस्तू या अँटिला येथील स्फोटक आणि मनसुख हिरण प्रकरणाशी संबंधित आहेत, असा दावा एनआयएने केला आहे. हे देखील वाचा- Mansukh Hiren death case मध्ये NIA ने Sachin Waze ला नेले मिठी नदी परिसराजवळ; CPU, गाड्यांच्या नंबर प्लेट्स आढळल्या
एएनआयचे ट्वीट-
On being confronted with circumstantial evidence, accused Sachin Waze confessed that some pieces of evidence were tossed into Mumbai's Mithi river. With help of divers, NIA today recovered DVRs, CPU, laptop, vehicle number plates & other items from the river: NIA sources (1/3) https://t.co/MM2qeh69km
— ANI (@ANI) March 28, 2021
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. याचदरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना' अग्रलेखातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केल्यानंतर महाविकास आघाडीत थिणगी पडण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना सुनावले आहे. तसेच महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नका, असेही म्हणाले होते.