Manoj Jarange Patil | PTI

मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावत असल्याने गावकर्‍यांचीही चिंता वाढत आहे. त्यांच्या आग्रहासमोर झुकत जरांगे पाटील यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास सलाईन घेतलं आहे. दरम्यान उपोषणाबाबतचा पुढील निर्णय आज (12 सप्टेंबर) ते जाहीर करणार आहेत. दुपारी 2 च्या सुमारास त्यांनी समाजबांधवांसोबत बैठक देखील बोलावली आहे. 29 ऑगस्ट पासून उपोषणावर बसलेल्या जरांगे यांनी अन्न, पाणी सोडल्याने आता त्यांना थकवा जाणवत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. जालना मध्ये 1 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या गोंधळातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंबधी अॅड. शिंदे यांची समिती नेमली असून त्यामध्ये जरांगे यांच्या प्रतिनिधीने यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नक्की वाचा: Maratha Reservation issue: मराठा आरक्षणाचा निर्णय कायदेशीररित्या वैध पाहिजे यावर सरकार ठाम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .

महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. सरकारने सध्या जारी केलेल्या आदेशामध्ये निजामकालीन वंंशावळीचे दाखले असलेल्यांनाच हे आरक्षण  देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये जरांगेंनी बदल सुचवला आहे.

मनोज जरांगेंना भेटण्यासाठी राज्यभरातून लोकं आली आहे. लोकांच्या प्रेमाने ते काही दिवसांपूर्वी आंदोलनस्थळी भारावून गेल्याचं चित्र होते. आंदोलनस्थळी छत्रपती संभाजीराजे यांना पाहूनही त्यांचे डोळे पाणावले होते.