Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये देखील 9 गुन्हे दाखल
Manoj Jarange Patil | Twitter

मराठा नेता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. (Beed) कारण जरंगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून (Shirur) शिरूर पोलिसांनी देखील नोटीस बजावली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. मध्यंतरी जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत फिरले. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दौरा केला होता.  या दौऱ्यामध्ये त्यांच्यावर आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिरूर पोलिसांनी (Police) गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली आहे. (हेही वाचा - Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात! मनोज जरांगे पाटील यांची भविष्यवाणी)

बीड पोलिसांनी एका जेसीबी व क्रेनला देखील दंड ठोठावला असून आता यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात असून त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत. मराठा आरक्षणाच्यावेळी केलेल्या आंदोलनावेळी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघ्या महाराष्ट्रात क्रांतीची ज्योत पेटवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र ढवळून काढला आहे. राज्यभरात त्यांच्याकडून आरक्षणच्या मागणीवर जोरदार आंदोलन करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनणार चित्रपट 

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याची हीच संघर्षकथा ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातील एक एक पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.