Manoj Jarang Patil and Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन हळूहळू पुन्हा एकदा उग्र स्वरुप धारण करताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarang Patil) आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. तसेच, राज्य सरकारलाही इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे ते पोलिसांना पुढे करुन मराठ्यांच्या पोरांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांना अडकविण्याची खेळी करत आहेत. आम्ही तुमचा बामणी कावा चालू देणार नाही. तुम्ही ब्राम्हण असाल. पण मीसुद्धा खानदानी मराठा आहे, हे लक्षात ठेवा, असा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'फडणवीस यांनी  'सागर' बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले.'

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, राज्य सरकार आणि पोलिसांनी काढलेले संचारबंदीचे आदेश पाळण्याचे अवाहन करतानाच संचारबंदी हटू दे. तुम्हाला दाखवून देऊ मराठा समाज काय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि मराठा समाजाला 'सागर' बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर मराठा समाजाच्या काही तरुणांना अटक करण्यात आली. अंबड तालुक्यात संचारबंदील लावली. आम्ही रात्रीच निघणार होतो. फडणवीस यांनी रात्री बंदुकीचा फोटो सोशल मीडियावर टाकला. दमच होता तर थांबायचं होतं. आम्हाला येऊ द्यायचं होतं. संचारबंदी कशाला लावली. मराठा समाजाला अडकविण्याचे धोरण होते. त्यांचा प्रयग रात्रीच होणार होता. पण कोणाकडेच काही साहित्य नव्हतं. म्हणून सकाळी निघणं गरजेचं होतं. देवेंद्र फडणीस यांच्यात दम नसल्यामुळे ते पोलिसांना पुढे करतात. त्यांच्या आडून सगळं करतात, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. (हेही वाचा, Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप - 'मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव')

'संचारबंदीचे उल्लंघन करु नका'

दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंतरवाली आंतरवाली सराटी येथून नागरिकांना अवाहन केले की, पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. पोलीस आणि कायद्याचा मना ठेवा. कोणीही संचारबंदीचे उल्लंघन करु नका. संचारबंदी उठल्यावर काय करायचे ते आपण पाहू. सर्वांनी शांततेत घरी जा. कोणीही गडबड करु नका. माझे आपल्याला अवाहन आहे, असे म्हणत जरांगे यांनी आंदोलकांना घरी पाठवले.  मराठा आरक्षण आणि सगे सोयरे मुद्द्यावर तसुभरही मागे हटणार नाही, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला विनंती आहे. आमच्या सगे-सोयरे मागणीची अंमलबजावी करा. तुम्ही मराठा समाजाची नाराजी ओढावून घेऊ नका. सरकारच्या आदेशाशिवाय कलेक्टर संचारबंदी लागू करुच शकत नाही. त्यामुळे त्यांनी रात्री डाव टाकला. रात्रीच्या अंधारात तरुण, महिला, निघाल्या होत्या. त्यांच्यावर पोलिसांना हात उचलायला लावणार होता. राज्यकर्त्यांना हे शोभत नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.