कल्याण: मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले; तीन डब्यांसह इंजिन सीएसटीच्या दिशेने रवाना (Video)
मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले (Photo Credit: File Photo)

मनमाड-पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने इंजिन फक्त तीन डब्यांसह पुढे रवाना झाले आहे. तर बाकी सर्व डबे मागेच राहिले. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला असून याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गाची वाहतुक विस्कळीत झाली आहे. कल्याण जवळील पत्री पुलाजवळ हा सर्व प्रकार घडला.

मध्य रेल्वेनेही ट्विट करुन या बिघाडाची माहिती दिली आहे. यावर लवकरच उपाययोजना करुन ही समस्या दूर करण्याचे आश्वासन मध्य रेल्वेने दिले असून प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला बळी पडावे लागले आहे. मात्र त्यात कोणतीही हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.