Nagpur Shocker: पत्नीने जेवण बनवायला नकार दिल्याने पतीने दिली घर जाळण्याची धमकी
Crime (PC- File Image)

नागपूर (Nagpur) मध्ये Ranjan Shao या 46 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना कैद करून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवार 19 फेब्रुवारीची असून घरगुती भांडणातून झालेल्या वादातून त्या व्यक्तीने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. रंजनने घरगुती एलपीजी सिलिंडरचा स्फोट करण्याची धमकी दिली, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि कोराडी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पत्नीने जेवण करण्यास नकार दिल्याने त्याने घर पेटवण्याची धमकी दिली होती.

TOI च्या रिपोर्ट्सनुसार, रंजन हा रेल्वे को ऑपरेटिव्ह बॅंक मध्ये हेड क्लर्क म्हणून काम करतो. त्याने रागाच्या भरात गॅस पाईपचा रेग्युलेटर उघडला आणि घर माचिसच्या काडीने पेटवून देण्याची धमकी देत होता. त्याच्या या विक्षिप्त भूमिकेमुळे बिल्डिंगमधील सुमारे 40-50 जणांचा जीव धोक्यात होता. त्यामध्ये त्याची पत्नी मिनू आणि 14 व 8 वर्षीय दोन मुलांचा देखील समावेश होता. हे कुटुंब 2009 पासून याच इमारतीमध्ये राहत आहे. Suicide Due To Body Shaming: पती सतत ‘लठ्ठ’ म्हणून चिडवायचा; अपमानाला कंटाळून महिलेची आत्महत्या, भायखळा येथील घटना, गुन्हा दाखल .

रंजन सध्या नागपूरामध्ये मायो हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून त्याच्यावर नर्व्ह डिसऑर्डरचे उपचार सुरू आहेत. मागील अनेक वर्षापासून रंजन आपल्या पत्नीसोबत चूकीचे वर्तन करत होता. मिनू पतीला सोडून गेली होती. तिने घटस्फोटाची देखील मागणी केली होती पण तिला मनवण्यात आलं आणि पुन्हा ते संसाराचा गाडा खेचू लागले.

मंगळवारी रंजन भडकला आणि त्याने घर जाळण्याची भाषा केली. दरम्यान शेजारी अलर्ट झाले आणि त्यांनी पोलिसांना सारा प्रकार कळवला. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन फायर ब्रिग्रेड बोलावली होती. त्यांनी पहिल्यांदा इमारती मध्ये राहणार्‍या 40-50 जणांना दूर केले.

पोलिसांनी आधी एका वृद्ध व्यक्तीला रंजन सोबत बोलायला पाठवले पण त्याने त्यांनाही कैद केले. मग त्यांची मुलगी बाबांना सोडा पोलिस जातील असे सांगायला गेली. ही युक्ती काम करून गेली. रंजनने त्यांची सुटका करण्यासाठी थोडासा दरवाजा उघडला तेव्हा पोलिस आत घुसले. घराचा ताबा घेत त्यांनी गॅसचा वास मोकळा केला.

रंजनला पोलिसांनी ताब्यात घेतले. मानसिक रित्या रंजन फीट नसल्याने त्याची विशेष काळजी घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले. दरम्यान नंतर रंजनला कोर्टातही दाखल करण्यात आले.