Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

पुणे विमानतळावर (Pune Airport) आज बनावट तिकीटांच्या माध्यमातून इंडिगो च्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक केली आहे. सलीम खान आणि नसरुद्दीन खान अशी संशयितांची नावं आहेत. बनावट तिकीटांच्या माध्यमातून ते इंडिगो (Indigo Flight) च्या विमानाने लखनऊला (Lucknow) जाण्याचा प्रयत्न करत होते.

बनावट तिकीटाद्वारा विमानतळात घुसून ते विमानात चढण्याचा प्रयत्न करताना एअरपोर्ट विभागाला तिकीटं बनावट असल्याचं समोर आलं. पोलिस सध्या या प्रकरणामध्ये दहशतवादी कनेक्शन आहे का? याचा तपास करत आहे. ते बनावट तिकीटाद्वारा उड्डाण का करत होते? याचा हेतू तपासला जात आहे. सध्या पोलिस दोघांचीही कसून चौकशी करत आहेत. रविवार 11 ऑगस्टच्या संध्याकाळी 4 च्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. Bengaluru Crime: मित्राला निरोप देण्यासाठी बनावट तिकीट वापरणाऱ्या महिलेला बेंगळुरू विमानतळावर अटक. 

विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये FIR दाखल केला आहे. Saleem Golekhan हा आरोपी चिंचवड च्या मोहन नगर भागात राहतो. पोलिसांनी तिकिट एजंट Nasseruddin Khan ला ताब्यात घेतले आहे. तो यूपीच्या श्रावस्तीचा निवासी आहे. सलीमचे वडील पुण्यात आले होते आणि त्यांनी रविवारी पहाटे लखनौला जाण्यासाठी परतीच्या विमानाचे तिकीट काढले होते, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याला विमानतळावर सोडण्यासाठी गेलेल्या सलीमने विमानतळावर येण्यासाठी बनावट विमान तिकीटाचा वापर केला. या बनावट तिकिटावर पीएनआर क्रमांक होता. पण एअरलाइन्सच्या काउंटरवर कर्मचाऱ्यांना ते बनावट असल्याचे समजले आणि सलीमला विमानतळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याला अटक केली.” असे पोलिसांनी म्हटलं आहे.