मुंबई: Facebook वर महिला असल्याचं भासवून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक
Representative image

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 29 वर्षीय व्यक्तीने सोशल मीडीयात फेसबूक वर तो महिला असल्याचं भासवून एका पुरूषाची आर्थिक लूट (Extorting Money) केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी सुशांत तळशीकर या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. सुशांतने तक्रारदारासोबत फेसबूकवर मैत्री केली होती. यावेळी तो महिला असल्याचं भासवत आणि त्याच्याच हाऊसिंग सोसायटीमधील असल्याचा दावा केला होता. यावेळेस त्याने काही अश्लील फोटोज आणि मेसेज देखील केले होते. अशी माहिती कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशन (Kasturba Marg Police Station ) मधील अधिकार्‍याने दिली आहे.

आरोपीने चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्स हाऊसिंग सोसायटीच्या ग्रुपमध्ये पोस्ट करण्याची धमकी देखील दिली. तसेच यापासून सुरक्षित रहायचे असल्यास 10 हजार रूपयांची मागणी केल्याचा त्याचा दावा आहे. पैशांचा व्यवहार करूनही धमकी देण्याचे प्रकार थांबले नव्हते. हे देखील नक्की वाचा: पत्नीचा न्यूड फोटो अपलोड केल्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून अटक .

पोलिसांनी अटक करताना आरोपीला आयपीसीच्या कलमांतर्गत खंडणी मागण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

दरम्यान मागील काही वर्षात सोशल मीडीया आणि डिजिटल व्यवहार जसजसे वाढले आहेत तसे सायबर क्राईमचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना तुमची फसवणूक होणार नाही ना? याची देखील काळजी घ्या आणि अनोळखी व्यक्तींसोबत वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करणं टाळा.