CM Eknath Shinde Convoy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला अटक
CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

CM Eknath Shinde Convoy: मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शुबम कुमार (30) असे आरोपीचे नाव असून वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. व्हीआयपी लेनमध्ये घुसूव त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य ताफ्याचा पाठलाग केला असे पोलिसांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुमारने ठाणे येथे टोल भरण्यास नकार दिला होती. त्यानंतर त्याने ठाण्याहून येत असलेल्या सीएम एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री 11 वाजता मुख्यमंत्री यांच्या दक्षिण मुंबईतील वर्षा बंगल्याकडे जात होता. (हेही वाचा:Gunaratna Sadavarte: सदावर्ते दाम्पत्यावर सहकार खात्याची मोठी कारवाई; एसटी बँकेच्या संचालकपदावरून हकालपट्टी )

सध्या आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठलाग करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या वायरलेस अलर्ट नंतर आरोपीला कॉन्स्टेबल शिंगाटे यांनी BWSL येथे अडवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासाठी लेन 7 आणि 8 आरक्षित केली होती.

मात्र, कुमारने आत न येण्याचा इशारा देऊनही ताफ्याचा पाठलाग केला. कुमार थांबला नाही त्यामुळे वरळी वाहतूक विभागाला अलर्ट पाठवण्यात आला. त्यानंतर त्याला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले," असे कॉन्स्टेबल शिंगाटे यांनी सांगितले. कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.