Mamata Banerjee On Sharad Pawar: शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा ममता बॅनर्जींकडून निषेध, केलं असं ट्विट
ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य- ANI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) 100 हून अधिक संपावर असलेल्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी दुपारी पवार घरी असताना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर अचानक आणि संतप्त आंदोलन केले. त्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीही केले नसल्याचा आरोप केला.  त्यांची मुलगी आणि लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत 107 जणांवर गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी ममता बॅनर्जींनी, मी भारतातील सर्वात ज्येष्ठ सार्वजनिक व्यक्तींपैकी एक, शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करते आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे स्वागत करते, असे ट्विट केले आहे. निषेधानंतर, पवार म्हणाले की, संतप्त झालेल्या MSRTC कामगारांची अबुद्धीमान नेतृत्वाने दिशाभूल केली.

सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीने या घटनेचा निषेध केला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.