प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

Malad Fire: मुंबईमध्ये दिवसेंदिवस आग लागण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. तसेच काल कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज ही दुसरी आगीची घटना मालाड येथे घडली आहे. तर मालाड येथे नागरिकांमध्ये आग लागल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच धुराचे मोठे मोठे लोट बाहेर पडताना दिसत आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे कार्य शर्थीने सुरु आहे. अद्याप आग लागल्याचे कारण समजले नाही आहे.