Major Fire At Pune Patil Estate Slum: पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला (Pune Patil Estate Slum) भीषण आग लागली आहे. पुण्यातील मोठी आणि दाट लोकवस्ती असलेला परिसर अशी या झोपडपट्टीची ओळख आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या पोहोचल्या आहेत. झोपडपट्टीमधील एका घरात सिलिंडर स्फोड झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगिचे नेमके कारण समजू शकले नाही.
या परिसरात आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सहा वर्षांपूर्वी या परिसराला अशीच भीषण आग लागली होती. त्याही वेळी मोठी वित्तहानी झाली होती. या झोपडपट्टीत सुमारे ४०० घरं आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण झोपडपट्टी रिकामी केली असून, येथील नागरिकांनी सुरक्षीतस्थळी हालवण्यात आले आहे.
Big fire at #Pune slum.@News18India @raydeep @News18lokmat pic.twitter.com/eHV0Fz6tu6
— Vivek Gupta News18 (@imvivekgupta) November 28, 2018
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पाच ते साहा झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. मुंबई-पुणे मार्गावरच ही झोपडपट्टी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीवर या आगीचा मोठा परिणाम झाला आहे. आकाशाच्या दिशेने उठणारे धुराचे मोठ्याच्या मोठे लोट दूरूनच पाहायला मिळत आहेत. आग लागल्यानंतर बाजूच्या झोपड्यांमधीलही सात ते आठ सिलिंडरचे स्फोट झाल्याने ही आग आणखी पसरल्याचे सांगितले जात आहे.