नागपूर: नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचे फोटो काढणाऱ्या दोन तरुणांची चौकशी
Anti-Terrorism Squad (file Photo)

नागपूर (Nagpur) येथे विमानतळ परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हेलिकॉप्टरची छायाचित्रे काढल्याप्रकरणी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने ( Anti-Terrorism Squad) दोन जणांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे. मुंबईतील एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये ही छायाचित्र आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु, या तरुणांनी नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचे छायाचित्र का काढले ? याची माहिती अद्याप समोर आली नाही. सध्या दहशतवाद विरोधी पथकांकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

अमर उजाला यांनी दिलेल्या वृतानुसार,  नरेंद्र मोदी हे भंडारा येथील साकोली मतदारसंघात सभेला संबोधित करायला जात होते. त्यावेळी दोन तरुणांनी नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचे छायाचित्रे काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हे छायाचित्र मुंबईतील एका तरुणांच्या मोबाईलमध्ये आढळले. दहशतवाद विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर हे दोन्ही तरुण नागपूर येथील रहिवासी असल्याचे कळाले चौकशीतून कळाले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करत आहे. आरोपींनी कोणत्या हेतूने हे छायाचित्र काढले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा- पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या 'त्या' कलाकारांवर FIR दाखल; अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 जणांचा समावेश

विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच तास राहिले असून महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. परंतु या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष आपला झेंडा रवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.