Maharashtra's COVID19 Tally Crosses 8 Lakh Mark: चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला 8 लाखांचा टप्पा; संपूर्ण आकडेवारी घ्या जाणून
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणखी 15 हजार 765 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 8 हजार 306 वर पोहचली आहे. यापैंकी 24 हजार 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 लाख 84 हजार 537 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 4: राज्यात ई-पास रद्द,राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्यास मुभा, Railway Ticket Booking 2 सप्टेंबरपासून सुरु

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले होते. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र, पुण्यात अजूनही कोरोनाचा उद्रेक पाहयला मिळत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे.