Photo credit: Pixabay

Maharashtra Weather Forecast: मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुंबई आणि ठाणे परिसराला यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. ठाणे आणि मुंबईत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पाऊस (Rain)कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय सातारा, रायगड आणि रत्नागिरी परिसरात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. दोन्ही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (64.65 ते 115..55 मिमी) कोसळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्या संमिश्र हवामान, ढगाळ वातावरणासोबत हवेत गारवा)

नाशिक, जळगाव, अमरावती, भंडारा आदी भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे. ठाण्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या दुर्घटना घडल्या. ज्यात झाडे कोसळणे, होर्डिंग पडणे, भिंत कोसळणे अशा घटना घडल्या.

शुक्रवारी ठाण्यातील फुटबॉल मैदानावर झालेल्या पडझडीच्या घटनेत सहा मुले जखमी झाल्याचे समोर आले आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागांमध्ये काल दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली आणि मोशी अशा काही परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. यावर्षी पहिल्यांदाच ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली.