Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यातून मान्सून (Monsoon) पूर्णपणे परतला असला तरी पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस होणार आहे. 16-17 ऑक्टोबर रोजी विदर्भ, संलग्न मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 16 ऑक्टोबर म्हणजेच आज नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तर 17 ऑक्टोबर रोजी नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार, बुलढाणा, जालना, बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

के. एस. होसाळीकर ट्विट:

दरम्यान, 11 ऑक्टोबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि दोन दिवसांपूर्वी मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी परतला. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले.