Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रात हैदोस घातलेला परतीचा पाऊस (Monsoon) आता राज्यातील आपला मुक्काम संपवण्याच्या वाटेवर आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली असून हळूहळू महाराष्ट्रातून पाऊस माघार घेत आहेत. मात्र जाता जाता राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 3-4 तासांत मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, रायगड आणि पुण्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विट्च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

रायगडच्या काही भागात काळे ढग दाटून आले असून पुढील 3-4 तासांत वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 28 ऑक्टोबर पर्यंत पाऊस संपूर्ण देशातून माघार घेईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Maharashtra Rains Update: पुणे,साता-यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वा-यासह पावसाची शक्यता, तर उद्यापासून पाऊस परतीच्या वाटेवर- IMD

यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद महाराष्ट्रात झाली. या पावसाने सर्व धरणे पूर्णपणे भरली असून त्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. मात्र परतीच्या मुसळधार पावसाने मात्र शेतीचे, पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. हा परतीचा पाऊस 1-2 दिवसात आपला राज्यातील मुक्काम संपवून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात काही भागात थंडीची चाहूल लागली असून काही भागात परतीच्या अनिश्चित पावसामुळे उकाडा जाणवत आहे. मुंबईतही उकाडा आणि थोडासा गारवा असा खेळ सुरु आहे.