Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 3-5 ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. विजेच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटा आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसेल. या काळात गोव्यातही पाऊस होईल. तसंच आज मुंबईत मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

28 सप्टेंबरपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिना सुरु झाल्याने पाऊस लवकरच आपली रजा घेईल आणि ऑक्टोबर हिटला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

K. S. Hosalikar Tweet:

यंदा मुंबई सह राज्यभरात दमदार पाऊस झाला. यामुळे जलसाठ्यात वाढ झाली असली तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्याने अनेकांच्या घरांचे, वाहनांचे नुकसान झाले आहे. वीज कोसळल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे परतीच्या पावसात खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.