Cold | Photo Credits: PTI

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चांगलीच थंडी पडली असून मुंबईत मात्र सर्वसाधारण थंडीची लाट आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगलाच वाढला. हा जोर असाच कायम राहणार असून पुणे (Pune), नाशिक (Nashik) मध्ये येत्या 7 ते 8 दरम्यान किमान तापमान 15 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तर मुंबईत (Mumbai) उद्या म्हणजेच 2 जानेवारीला किमान तापमान 20-22 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील थंडीची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी धुक्यामुळे रस्ते धुसर झाले आहेत. नागपूर, यवतमाळ सह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पारा घसरला आहे.हेदेखील वाचा- ठाणे येथे नवं वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 416 जणांसह 200 सह प्रवाशांवर कारवाई

त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान उद्या पुणे नाशिक मध्ये 16 अंश सेल्सियस इतके किमान तापमान दिसत असून 8 डिसेंबरपर्यंत हे तापमान आणखी कमी होत जाऊन 15 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट असली तरीही काही दिवसांपूर्वी काही भागांत हलक्या पावसाच्या सरी देखील बरसल्या होत्या. यामुळे पिकांचे नुकसान देखील झाले. मात्र सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसली तरीही थंडी कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.