महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असून पुढील 1-2 दिवस उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात थंडी कायम राहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंदाकडून देण्यात आली आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही जिल्ह्यांत पुन्हा पाऊस बरसणार असल्याचेही हवामान केंद्राने सांगितले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी राजाच्या देखील चिंतेमध्ये भर पडणार आहे. हे देखील नक्की वाचा: Weather Update: पुणे जिल्हा 29 जानेवारीला हंगामातील दुसरा सर्वात थंड दिवस म्हणून नोंदवला .
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये थंडी कायम राहणार आहे. हळूहळू फेब्रुवारी महिन्यात दुसर्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई मध्ये रविवार (30 जानेवारी) दिवशी कमाल तापमान 33 आणि किमान 18 अंश सेल्सिअस इतके होते. पुण्यात देखील कमाल 28 किमान 12 अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबई मध्ये किमान तापमान आज कुलाबा मध्ये 19 तर सांताक्रुझमध्ये 17 अंश इतके नोंदवण्यात आले आहे.
हवामान खात्याचा अंंदाज
पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3yVNq भेट द्या pic.twitter.com/jBkPDcShdF
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) January 30, 2022
हवामान केंद्राच्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे.